एसएसबीटी फार्मसी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्रॅम संपन्न

ssbt colloge

 

जळगाव प्रतिनिधी । येथील एस.एस.बी.टी. संचालित इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये दि. २० ते २१ ऑगस्ट रोजी एआयसीटीच्या सुचनेनुसार प्रथम वर्षाच्या मुलांसाठी इंडक्शन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत माहिती अशी की, शालेय जीवनातून विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश करणे हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील आव्हानात्मक बदल असतो. विद्यार्थी नवीन महाविद्यालयामध्ये विविध विचारसरणी, पार्श्वभूमीसह प्रवेश करतात. त्यांना महाविद्यालयाचे फारसे ज्ञान नसते. एक महत्वाचे कार्य म्हणून उच्च शिक्षणात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करत असून त्यांना नवीन भूमिकेसाठी तयार करण्यासाठी एखादा अभिमुख कार्यक्रमातून त्यांच्यामध्ये प्रेरणा, निर्माण करून यशस्वी नागरिक निर्माण व्हावा, हे कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या संस्थेबद्दल सविस्तर माहिती, डी फार्मसी अभ्यासक्रमाबद्दल माहिती, व्यक्तिमत्व विकास, सकारात्मक दृष्टिकोन, योग व ध्यानधारणा, विविध क्रीडा प्रकार, फार्मसी करिअर आदी विषयांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांना डॉ. चैताली पवार (अधिव्याख्याता), फार्मसी विभाग शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव यांनी सकारात्मक विचारसरणी आणि ध्यानधारणा या विषयांवर मागर्दर्शन केले. तर डॉ. निलेश वाघ यांनी योगची कार्यशाळा घेतली. महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. जितेंद्र सोनवणे यांनी क्रिकेट, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस इत्यादी खेळाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी प्राध्यापक कृष्णा श्रीवास्तव (सहयोगी प्राध्यापक) मेकॅनिकल विभाग, एस.एस.बी.टी. इंजिनीरिंग महाविद्यालय, डॉ.जि.के.पटनाईक (संगणक विभाग प्रमुख), डॉ. विनोद मोकळे (प्राचार्य) इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी (बी फार्मसी) व आदी उपस्थितीत होते.

तसेच महाविद्यालयातील वसिम शेख, पूनम कासार, प्रिया पाटील यांनी डी फार्मसी अभ्यासक्रम, महाविद्यालयातील विविध उपक्रम यांची सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल लांडगे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त पालनाचे महत्व पटवून दिले. उद्घाटन प्रसंगी डॉ.के.एस.वाणी, डॉ.एस.पी.शेखावत, बी.सी.कछवा उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वय अपर्णा लाड, तर संचालन कोमल खिल्लारे यांनी केले.

Protected Content