जे.टी.महाजन स्कूलमध्ये चंद्रयान प्रदर्शनाचे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जे.टी. महाजन इंग्लिश स्कुल यावलच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण रूजावे या करीता विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांच्या विज्ञान उपकरणे प्रदर्शनात इत्तया५ ते१o वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी चंद्रयान,वीज निर्मिती, रेन वॉटर, वाटर हार्वेस्टींग या सारखी अनेक उपयुक्त उपकरणे प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. विज्ञान  प्रदर्शनात साठी स्कुलच्या इयत्ता ५ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांचा एक गट व आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा दुसरा गट असे विभाग करण्यात आले होते, विद्यार्थ्यांनी उपकरणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जी डी कुलकर्णी, मुख्याध्यापक सरस्वती विद्या मंदिर यावल हे उपस्थित होते. डॉ नरेंद्र महाले, समन्वयक तालुका विज्ञान मंडळ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना महाजन यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर उत्कृष्ठ असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या प्रिन्सिपल डॉ किरण खेट्टे तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका राजेश्री लोखंडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपकरणांची मांडणी दिपाली धांडे यांच्या संकल्पनेतुन करण्यात आली. कार्यक्रम सुनियोजित कार्यबध्द करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांचे देखील सहकार्य लाभले.

 

Protected Content