जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील मुसळी ते वराड गावादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत ममुराबाद येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २४ जून रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होतते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात शवाविच्छदेन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बापू जंगलू कुंभार वय ३८ रा. ममुराबाद ता. जळगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात बापू कुंभार हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. विटभट्टीवर काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. सोमवारी २४ जून रोजी बापू हा दुचाकीने धरणगावकडून जळगावकडे येण्यासाठी निघाले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास मुसळी ते वराड गावादरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बापू कुंभार याचा जागेवर मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुशांत निकुंभ यांनी तपासणी करून मयत घोषीत केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत बापू कुंभार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.