जळगाव प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील मेरिका कंपनीजवळ काहीही कारण नसतांना एका तरूणाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या जबड्याला दुखापत झाल्याचे फ्रॅक्चर करण्यात आल्याची घटना ९ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १५ मार्च रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पंकज जयपालसिंह चौधरी वय २९ रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ९ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता एमआयडीसीतील मेरीको कंपनीजवळ काहीही कारण नसतांना संशयित आरोपी विक्की उर्फ गणेश गोसावी, राहूल माळी आणि शुभम महाजन सर्व राहणार सुप्रिम कॉलनी, जळगाव या तिघांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच त्याच्या जबड्याला बेदम मारहाण केल्याची गंभीर दुखापत केल्याने फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी शनिवारी १५ मार्च रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.