कंजरवाडा परिसरातून साडे तीन लाखांची गावठी हातभट्टीची दारू नष्ट; १० जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा

 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील कंजरवाडा भागात बेकायदेशीररित्या अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या १० जणांवर कारवाई करत सुमारे ३ लाख ६१ हजार ९५० रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलिसांनी आज सकाळी ११ केली. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांडे चौक ते सिंधी कॉलनी दरम्यान असलेल्या सिंगापूर कंजरवाडा, जाखनी नगर आणि नवल कॉलनी या भागात बेकायदेशीररीत्या अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार व विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने धडक कारवाई करत सुमारे ३ लाख ६१ हजार ९५० रुपये किमतीचे गावठी दारू बनवण्याचे कच्चे व पक्के रसायन तसेच गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली. दारू तयार करणारे व विक्री करणारे बिंदिया गणेश बागडे, अनिता सुधाकर बागडे, सरला कुंदन अभंगे, प्रेमाबाई गजमल कंजर, सोनी नितीन नेतलेकर, अनिता मंगलकुमार गुमाने, रंजीत धीरज भाट, वनाबाई देवसिंग बाटूंगे, योगेश महेश भाट, बेबीबाई हिरा नेतले सर्व रा.जाखनी नगर, कंजरवाडा जळगाव यांच्यावर धडक कारवाई करून त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, पो.उ.नि. विशाल वाठोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गफ्फार तडवी, मंदा बैसाने, राजेंद्र कांडेलकर, विजय नेरकर, अल्ताफ पठाण, नीलोफर सय्यद, इम्रान सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल योगेश बारी, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, इम्रान शेख, सतीश गर्जे,  सिद्धेश्वर डापकर, सदानंद नाईक यांच्यासह होमगार्डचे पथक यांनी कारवाई केली.

Protected Content