Home क्राईम नशिराबाद महामार्गावर अपघात ; एक जखमी

नशिराबाद महामार्गावर अपघात ; एक जखमी

0
102

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चारचाकी आणि दुचाकीत झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना तालुक्यातील नशीराबाद गावानजीक महामार्गावर घडली आहे.

नशीराबाद येथे मोहिब्बुल हक मन्यार वय ३९ हा वास्तव्यास आहे. तो मजुरी काम करुन उदरनिर्वाह भागवतो. मोहिब्बुल हा १ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याच्या एम.एच. १९ डी.एक्स ६२८६ क्रमाकांच्या दुचाकीने महामार्गाने जात असतांना महेंद्रा शोरुमजवळ त्याच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. अपघातानंतर चारचाकीचालक घटनास्थळावरुन पळून गेला होता. या अपघातात मोहिब्बुल हा जखमी होवून त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले होते.

याप्रकरणी मोहिब्बुल याने शुक्रवार, ३ जून रोजी चारचाकी चालकाविरोधात नशीराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन चारचाकीवरील अनोळखी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound