जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पालक समुपदेशक आणि शिक्षणतज्ज्ञ देवयानी गोविंदवार यांची महाराष्ट्र शासनाच्या जळगाव जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची यादी अधिसूचनेद्वारे जाहीर केली आहे. बाल कल्याण समिती ही 17 वर्ष वयाखालील काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकास,पुर्नवसन आणि सर्वच स्तरावर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी -बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 – नुसार प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून असलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हास्तरावर काम पाहते. दर तीन वर्षांनी कार्यकाळ संपल्यावर नवीन समिती गठीत करण्यात येते. शासनातर्फे नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय मंडळाकडून मुलाखत घेऊन समिती सदस्यांची नियुक्ती केली जाते.
राज्यशासनाने जळगाव जिल्ह्याच्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून देवयानी गोविंदवार, सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, विद्या रवींद्र बोरनारे, वैशाली विसपुते, वृषाली जोशी यांची नियुक्ती केली आहे.
आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.