भाजपला धक्का; माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षात घेऊन महाविकास आघाडीला धक्का देणाऱ्या भाजपलाच जोरदार झटका मिळाला आहे. सूर्यकांता पाटील यांचा नांदेड व हिंगोलीसह लगतच्या मतदार संघांवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे या भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ताकदीत मोठी वाढ होणार आहे.

सूर्यकांता पाटील यांनी 2014 मध्ये भाजपत प्रवेश केला होता. पण त्यांचे मन भाजपमध्ये रमले नाही. त्या भाजपच्या स्थानिक पातळीवरील राजकारणाला कंटाळल्या होत्या. त्यांनी भाजपच्या कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवले होते. यामुळे त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर 2 दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आपल्या पुढील राजकारणाचे संकेत दिले. त्यानुसार त्यांनी सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

Protected Content