फकृद्दीन शेख यांची पहूर येथे वाहतूक नियंत्रक पदी नियुक्ती

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर पेठ येथील सुपुत्र व जामनेर आगारातील वाहक फकरुद्दीन शफीओद्दिन शेख यांची पहूर येथे वाहतूक नियंत्रक कक्षात वाहतूक नियंत्रक म्हणून नुकतीच जामनेर आगारातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.

पहूर येथील मूळ रहिवासी फकरुद्दीन शेख हे गेल्या 30 वर्षापासून जामनेर आगारात कार्यरत असून त्यांची पहूर येथे वाहतूक नियंत्रक कक्षात वाहतूक नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.पहूर व परिसरातील तब्बल 2000 च्या वर विद्यार्थी शिक्षणासाठी जामनेर, शेंदुर्णी, जळगाव इत्यादी ठिकाणी जात असतात त्यांच्या निवडीमुळे पहूर येथील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची एस टी पासेस ची सोय याठिकाणी ठिकाणी होणार असून सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर पासेस मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या निवडीबद्दल सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

Protected Content