जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील येथील ब्रह्मश्री बहूद्देशीय संस्थेतर्फे २०२४ चा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न करण्यात आला. ब्रह्मश्री परिवारातर्फे दरवर्षी ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. या वर्षी ही इयत्ता नववी ते बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्राँफी, विवेकानंदांचा फोटो, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनंतराव तोंडूलकर व सौ.माधूरीताई कुलकर्णी-भट उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री तोंडूलकर यांनी भविष्यातील शिक्षणपद्धती कशी असेल याबद्दल सांगताना त्यांनी नवीन अभ्यासक्रमात दहावी नंतर चार वर्षांची पदवी राहील. यात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांची निवड करता येईल. तसेच पदवी प्राप्त झाल्यानंतर पीएचडी करता येईल.
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आधी गोलसेटींग करावे लागेल व स्वतःच्या क्षमता वाढवून दुर्दम्य इच्छाशक्ती व मनोबल दाखवावे लागेल. तसेच माधुरीताई यांनी विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले तरी खचून जाऊ नये. तसेच पालक व बालक सुसंवाद महत्वाचा आहे. आणि जेथे समस्या जास्त तेधे कार्यकतृत्वाला वाव जास्त असतो. विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात पालक, समाज, देशाशी प्रामाणिक रहा, चांगले मित्र व मैत्रीणी निवडा.
यावेळी शारदा अकाउंटंसीच्या मयुर न्याती यांनी कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली तसेच मुलांना कोणकोणते विविध मार्ग उपलब्ध आहेत हे सांगितले. या कार्यक्रमासाठी ब्रह्मश्रीचे संस्थापक अध्यक्ष अशोकजी वाघ, सदस्य डाँ.निलेश राव, कमलाकर फडणीस, निशाणदार, उदय खेडकर, प्रशांत कुलकर्णी सर, शेखर शेंदुर्णीकर, प्रसाद जोशी, भुषण भंडारी, सचिन जोशी, दिपक कुलकर्णी, विलास देशमुख, दिपक महाजन, विशाखा देशमुख, रेखा कुलकर्णी, मेधा कुलकर्णी, पल्लवी भंडारी, सुचिता कुलकर्णी, हेमलता कुलकर्णी, छाया वाघ, संगिता भटमुळे, व इतर समाज बांधवांनी परिश्रम घेतले.