एकलव्य स्केटिंग अकॅडमीत योगा ऑन स्केट २०२४ स्पर्धा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकलव्य क्रीडा संकुल संचालित एकलव्य स्केटिंग अकॅडमीद्वारे दहाव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त एकलव्य स्केटिंग रिंकवर योगा ऑन स्केट स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुलातील स्केटिंग विभागाच्या विद्यार्थी खेळाडूंनी स्केट परिधान करून योगाची प्रात्याक्षिक करून दाखवले. एकलव्य स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी स्केटसह बैठे, उभ्या स्थितीत आणि फिरत्या स्थितीत योगासने करून दाखविले. प्रमुख अतिथी म्हणून योगा विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.देवानंद सोनार, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, तसेच पालक प्रतिनिधी म्हणून नंदकिशोर देवरे, आरती पाटील, सुनील रेवतकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले.

जियांश जितेंद्र चौधरी, आराध्या आकाश काळे, विश्व नंदकिशोर देवरे, धैर्य नंदकिशोर देवरे, लियान मधुसूदन राणे, अरना अमित पाटील, पार्थ शिवाजी पाटील, मनस्वी हेमंत काळे, दिव्या रवींद्र सपकाळे, हार्दिक सचिन जोगी, निर्भय सागर पाटील, पारमी योगेश तायडे, खुश नितीन बाविस्कर, संकल्प प्रशांत बाविस्कर, जेनिश नितीन बाविस्कर, नमन संदीप जाधवानी, तनय दर्शन काळे, ओजल तुषार तळेले, क्षितिज प्रशांत पाटील, सान्वी सुधीर रेवतकर, यश रवींद्र सपकाळे, जितेश तुलाराम शर्मा, जान्हवी मिलिंद चिंचोलेकर, अवधूत संदीप पाठक, पुष्कर पंकज फालक, निरंजन किरण भावसार, आयुष योगेश ढाके या खेळाडूंनी स्केटिंग विभागाचे विभाग प्रमुख व मुख्य प्रशिक्षक डॉ.रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाने सराव केला. यास सहायक प्रशिक्षक रिना पाटील यांचे सहकार्य लाभले. विजेत्या खेळाडूंचे डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी कौतुक केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सोहम कोष्टी ,चेतना काथार, दिव्या लावणे, कुशल राठोड, व एकलव्य क्रीडा संकुलातील सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content