शहरातील रस्त्यावरील वादग्रस्त अतिक्रमणे हटवा

 

 

जळगाव : प्रतिनिधी । शहरातील काही मुख्य आणि वर्दळीच्या रस्त्यांवर विनापरवानगी वादग्रस्त अतिक्रमण उभारण्यात आली आहेत. शुक्रवारी सकाळी महापौर, आयुक्तांनी काही अतिक्रमणांची पाहणी केली. ही अतिक्रमणे हटवण्याची सूचना महापौरांनी आयुक्तांना केली

सर्व अतिक्रमणाच्या विश्वस्तांना आणि प्रमुख धर्मगुरूंना विश्वासात घेत, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे आणि गठीत केलेल्या समितीच्या निर्देशांचे पालन करून कोणतीही कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही हे लक्षात घेऊन हे वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यात यावी, असे पत्र महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांना दिले आहे.

जळगाव शहरातील काही वादग्रस्त अतिक्रमण रस्त्यात अडथळा निर्माण करीत असल्याने ते हटविण्यात यावे यासाठी प्रशासनाकडून शुक्रवारी पाहणी करण्यात आली. महापौर सौ.भारती सोनवणे, आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, उपायुक्त संतोष वाहुले, समीर बोरोले आदींसह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.

महापौरांनी दिले आयुक्तांना पत्र
रस्त्यात अडथळा ठरणारे वादग्रस्त अतिक्रमण हटविताना संबंधित अतिक्रमणाच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घ्यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला संपूर्ण माहिती देणे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याची दक्षता घेऊन वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यात यावी, अशी विनंती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Protected Content