‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूर भागातील बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह मेहरूणच्या खदानीजवळ संशयास्पद आढळून आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या गुन्ह्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह पोक्सो कायद्यान्वये संशयित आरोपीस अटक केली होते. आज न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील आदर्श नगरातून रविवारी दुपारी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा जे.के.पार्क या उद्यानाजवळ मेहरुण तलावात मृतदेह आढळून आला होता. मुलीच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त होता. सीसीटीव्ही फुटेज तसेच एका महिलेने मृत्यूच्या आदल्या दिवशी मुलीला एका तरुणासोबत जातांना पाहिले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात या गुन्ह्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह पोक्सोचे कलम वाढविण्यात आले असून पोलिसांनी विशाल संतोष भोई (वय 21 रा. रामेश्‍वर कॉलनी) यास अटक केली होती. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विशाल भोई यास अटक केल्यावर शुक्रवारी त्यास जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. संशयित तरुण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधातय एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांमध्ये संशयित हा नुकताच जामीनावर सुटलेला आहे सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी युक्तीवाद केला. युक्तीवादाअंती न्या. एस.जी.ठुबे यांनी संशयित विशाल भोई यास 28 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.

Protected Content