घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एकावर कारवाई; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील मेहरून येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील बगीचामध्ये बेकायदेशीरित्या घरगुती गॅसचा काळाबाजार करून मालवाहू वाहनांमध्ये भरत असताना एकावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरून जवळील छत्रपती शिवाजी महाराज बगीचामध्ये बेकायदेशीर रित्या रिक्षामध्ये व इतर वाहनांमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करून अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी गुरुवारी १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता छापा टाकला. यावेळी घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या संशयित आरोपी सलीम शहा अरमान शहा वय-३६, रा. तांबापुरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून जवळपास १९ हजार रुपये किमतीचे गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचे साहित्य, वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश गरजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सलीम शाह अरमान शहा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.

Protected Content