पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील टेहू येथील भुमीपुत्र व जिल्हा विशेष शाखेचे निवृत्त पोलीस निरीक्षक दिलीप विक्रम पाटील यांनी आपल्या शासकीय सेवेत उत्तम कार्याची दखल घेत महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या पारोळा तालुका कायदा व सुव्यवस्था व पोलिस प्रशासकीय यंत्रणा समितीवर तालुकाध्यक्ष पदी पाटील यांची आज नियुक्तीपत्रा व्दारे नियुक्ती केली.
शेतकऱ्यांना विशेष करून विविध कायदा व पोलिस प्रशासनाचे विविध प्रकारच्या अडचणी येत असतात व त्यांना न्याय देण्याचे कार्य श्री पाटील तालुक्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेला मजबूत करण्यासाठी व शेतकरी वर्गाला संघटनेच्या एका छताखाली एकत्र आणून संघटनेचे ध्येय धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी,कष्टकरी, कामगार वर्गापर्यंत पोहचवून संघटना मजबूत करणे व मदत करणे अभिप्रेत असल्याचे नियुक्ती पत्राद्वारे सांगितले आहे.नियुक्ती पत्र महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या मुख्य कार्यालयात संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले.
यावेळी जळगाव जिल्हा सरचिटणीस आनंदराव पाटील, पारोळा तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी, धरणगाव तालुका अध्यक्ष संजय चव्हाण,भडगाव तालुका अध्यक्ष अभिमान हाटकर,सोयगाव तालुका अध्यक्ष ईश्वर पाटील,चाळीसगाव तालुका अध्यक्ष के.बी.शिंदे,पंचायत समिती गणप्रमुख महाळपूर शांताराम पाटील, मृद व जलसंधारण समिती तालुकाध्यक्ष एस झेड पाटील,मेहू शाखाध्यक्ष रावसाहेब पाटील, तामसवाडी शाखाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, सांगवी शाखाध्यक्ष आनंद पाटील गलवाडा शाखाध्यक्ष विजय देवरे,मालखेडा शाखाध्यक्ष श्री पाटील,सांगवी शाखाध्यक्ष नितीन पाटील उपस्थित होते.
दिलीप पाटील यांची महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या कायदा व सुव्यवस्था समितीवर नियुक्ती
7 months ago
No Comments