जिल्ह्यात आज ७५३ कोरोना पॉझिटीव्ह; ५१३ रूग्ण झालेत बरे !

 

जळगाव प्रतिनिधी । आज आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ७५३ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून ५१३ रूग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. जळगाव, अमळनेर आणि चोपड्यात संसर्ग वाढलेलाच असल्याचे यातून दिसून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ७५३ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक ११५ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल पारोळा -९६, अमळनेर-८७ तर भुसावळ तालुक्यात ७४ रूग्ण आढळून आलेत.

आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-११५; जळगाव ग्रामीण-१९; भुसावळ-५०; अमळनेर-८७; चोपडा-७४; पाचोरा-३६; भडगाव-४२; धरणगाव-२७; यावल-३८; एरंडोल-९; जामनेर-३८; रावेर-१४; पारोळा-९६; चाळीसगाव-५८; मुक्ताईनगर २७, बोदवड-१८ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ५ असे एकुण ७५३ रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर-६६२१ ; जळगाव ग्रामीण-१५८९; भुसावळ-१६९४; अमळनेर-२५११; चोपडा-२५०७; पाचोरा-११२८; भडगाव-१३२९; धरणगाव-१३८२; यावल-९५०; एरंडोल-१७०८ ; जामनेर-२२३८; रावेर-१३४६; पारोळा-१५०३; चाळीसगाव-१७७८; मुक्ताईनगर-८१४; बोदवड-४२६ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १६२ असे एकुण २९ हजार ६८६

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २९ हजार ६८६ इतकी झालेली आहे. यातील २१ हजार ३४३ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५१३ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ९ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ८४० इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ७ हजार ५०३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content