परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर नाशिक दौऱ्यावर

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्व वाढलेले दिसत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज नाशिक दौऱ्यावर आले आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली होती.
एस जयशंकर यांनी आज १६ मे रोजी काळाराम मंदिरात दर्शन घेतले आणि त्यानंतर ते कॉलेजरोडवरील गुरूदक्षिणा हॉलमध्ये व्याख्यान देणार आहे. प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम नाशिककरांसाठी करण्यात आला आहे. यासोबत एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये विविध बैठकांचेही आयोजन करण्यात आले आहे.

Protected Content