श्री संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त पुतळ्याला अभिवादन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तेली समाजाचे आराध्यदैवत  ग्रंथकार संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आज रोजी समाज बांधवांवतीने व विविध शासकीय कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.

शहरातील हत्ती गल्लीमधील जुन्या तेली भवन येथे श्री संताजी महाराज मंदिरात गोपाल चौधरी या नवदांपत्यांच्या हस्ते अभिषेक व विधिवत पूजन करण्यात  येऊन महाआरती करण्यात आली. यावेळी संताजी महाराजांचा एकच जयघोष करण्यात आला. त्यानंतर समाजातील समाज बांधव व नूतन कार्यकारणी पंचमंडळ यांनी आझाद चौक येथे पायी जाऊन श्री संताजी जगनाळे महाराज यांचा भव्य दिव्य अश्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजा पाठ केली.

प्रसंगी तेली समाज  समाज कार्यकारणी पंच मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, संजय चौधरी सतीश चौधरी, मनोज चौधरी, दिलीप चौधरी साहेबराव चौधरी, विश्वास चौधरी, कपिल चौधरी, गोकुळ चौधरी,नवल चौधरी, किशोर चौधरी, रवींद्र चौधरी, अनिल चौधरी, दिलीप चौधरी,  भास्कर चौधरी, सुरेश चौधरी, किरण चौधरी या पंच मंडळ सह संजय चौधरी, प्रल्हाद चौधरी, धर्मदास चौधरी, सुदाम चौधरी, भागवत चौधरी, वामन चौधरी,प्रवीण चौधरी यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Protected Content