दळवेल जवळ ४०७ गाडी आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक

darvel

कासोदा प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील दळवेल जवळील हॉटेल स्वर्ग समोर (दि.१३) रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर आणि ४०७ गाडीची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंकटी येथील शेतकरी दिलीप नामदेव पवार यांचे ४ टन मालाने भरलेले कपाशीचे ट्रॅक्टर पारोळा येथे येत होते. व त्या मागेच ४०७ मालवाहू गाडी मागून येत असतांना समोरच चालू असलेल्या ट्रॅक्टरला धडक बसल्याने हा अपघात झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. समोरासमोर धडक होताच ट्रॅक्टर रोडवर आडवे पडले. या अपघात ७२ वर्षीय भवरखेडे येथील इसमास पायास दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात हालविण्यात आले. या घटनेनंतर रस्तावर ट्राफिक जमा झाली होती. नंतर ती सुरळीत करण्यात आली.

Protected Content