भाजप कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले, संबंध नाही कसा? ; शिवसेनेची टीका

BJP Shiv Sena alliance

मुंबई (वृत्तसंस्था) आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे लेखक गोयल यांच्याशी पक्षाचा संबंध नाही, असे भाजपाने म्हटले आहे. परंतू भाजप कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. हे गोयल आजही म्हणतात, आमचे शिवाजी फक्त नरेंद्र मोदीच! मग गोयलशी आमचा संबंध नाही कसा? असे म्हणत शिवसेनेनेवर भाजपावर पुन्हा एकदा टीका केली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्याशी संबंध नसल्याचे भाजपाने म्हटले आहे. यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र सदनावर ज्यांनी हल्ला केला त्या जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? भाजप कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले त्यावेळी भाजपचे नेते हजर होते. हे गोयल आजही म्हणतात, ”आमचे शिवाजी फक्त नरेंद्र मोदीच!” आता यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे. शिवरायांच्या वंशजांनी म्यानातून सपकन तलवार काढावी. ती आता काढली आहे व त्याबद्दल त्यांचे आभार! भाजपची तोंडे ‘म्यान’ झाली म्हणून आम्ही हे शिवव्याख्यान मांडले,” अशा शब्दात शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे.

Protected Content