सावदा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ; स्वच्छता व अतिक्रमणाने गाजली

photo news

सावदा, प्रतिनिधी | राष्ट्रवादी नगरसेवक तथा गटनेते फिरोज खान यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (महाराष्ट्र विकास आघाडीचे )यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला सर्वनुमते मजूर करण्यात आला. आजच्या सभेत वसुली व अतिक्रमण स्वछता व नगरसेवक यांनी दिलेल्या अर्ज यावर नगरसेवक राजेंद्र चौधरी,राजेश वानखेडे ,फिरोज खान पठाण यांनी नगराध्यक्ष यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार दि १३ रोजी सकाळी ११वाजता नगराध्यक्षा अनिता येवले यांचे अध्यक्षतेखाली नगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा शबाना तडवी, मुख्यधिकारी सौरभ जोशी उपस्थित होते. विषय क्रमांक १४ स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत हगणदरी मुक्त ODF ++ दर्जा प्रमाणीकरण होणेबाबत विचार करणे हा विषय स्वच्छते संदर्भात असल्याने यावर राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे, तसेच सत्ताधारी गटाच्या नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांनी देखील शहरातील अस्वच्छतेबाबत प्रशासनास जाब विचारला. शहरात अनेक ठिकाणी स्वच्छता नाही कचरा काही ठिकाणी ३-३ दिवस उचलला जात नाही, ज्याने ठेका घेतला आहे ते कोण हे माहित नाही. ठेकेदाराचे कर्मचारी फोन उचलत नाही अशी तक्रार करत शहरात विविध भागात असलेल्या अस्वच्छतेचा पाढाच वाचला. फिरोजखान यांनी काही ठिकाणी धार्मिक स्थळामध्ये दिवसा डुकरे शिरत आहे याचा उल्लेख करीत हीच स्वछता आहे का ? असा जाब विचरला. खोटे सांगून असे ३ स्टार नामांकन नको प्रथम खरोखरच तशी व त्या दर्जाची स्वच्छता राखा व नंतर हे विषय मांडा असे सांगितले. यावर अध्यक्ष यांनी एकवेळ मतदान घेण्याचा उल्लेख देखील केला पण विरोधकांसह सत्ताधारी गटातील नंदाबाई लोखंडे यांनी हा विषय घेतल्यास आपला विरोध नोंदवा अशी भूमिका घेतल्याने अखेर सदर दोन्ही विषय देखील स्थगित ठेवल्याने एकूण ३ विषय या सभेत स्थगित ठेवण्यात आले. दरम्यान, सभेत ऐकूण १५ विषयांवर चर्चा झाली. त्यात मागील सभेचे इतिवृत्त वाचन किरण चौधरी यांनी केले. शासनाच्या शहरातील सांडपाणी व्यवस्थापन योजना पर्यवर्णाच्या दृष्टीने राबविणे करीता भूमिगत गटारीकरीता सर्वे करणे, कुटुंब निवृत्ती वेतन, हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सुविधा विकसित करणेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणे. विशेष रस्ता अनुदान योजनेतून गट नं८५,१४५६,५४,५५,५६,६५१ डांबरीकरण करणे, कत्तलखान्याजवळ स्लॅब कन्व्हर्ट बांधणे याविषयांवर चर्चा करण्यात आली. प्रशासनाकडून बांधकाम अभियंता ध.शा.राणे. आरोग्य महेश चौधरी यांचे सह पालिका विविध विभाग कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content