पळपुट्यांची साथ सोडून संघाशी लढायला तयार रहा – ॲड. प्रकाश आंबेडकर ( व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 03 22 at 17.42.43

जळगाव प्रतिनिधी । वंचित बहुजन आघाडीला सत्तेची गरज नाही किंवा हौस नाही. मात्र राज्यात जो शिक्षणाचा बाजारीकरण सुरू आहे, शिक्षणात ठेकेदारी पध्दत बंद झाली पाहिजे, त्याला कुठेतरी थांबविण्याचे गरज आहे. कॉग्रेसला तर राज्यात कोठेच स्थान नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस अल्प जागेवर स्थिर असल्याने त्यांची परिस्थित डगमगण्यासारखी आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्षा भाजपा आणि आरएसएसशी सामना करण्यासाठी सक्षम नसून ते पळपुटे असल्याची टिका यावेळी ॲड. आंबेडकर यांनी केला. अशा पळपुट्या पक्षाशी सोडून आरएसएसशी सामना करण्यासाठी संविधानाच्या चौकटीत राहून वंचित बहुजन आघाडीची तयार आहे. यासाठी मतदार बांधवांची गरज असल्याचे यावेळी ॲड. आंबेडकर यांनी यावेळी जाहिर सभेत केले.

महामेळाव्यात यांची होती उपस्थिती
वंचित बहुजन आघाडीने राज्यभर लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर आघाडीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार अंजली बाविस्कर आणि रावेर लोकसभेचे उमेदवार नितीन कांडेलकर यांच्या प्रचारार्थ शिवतीर्थ मैदानावर बहुजन वंचित आघाडीचा सत्ता संपादन महामेळावा घेण्यात आला त्यावेळी वंचित आघाडीचे प्रणेते अँड. बाळासाहेब आंबेडकर बोलत होते. यावेळी वंचित आघाडीचे प्रणेते अँड. बाळासाहेब आंबेडकर, भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माजी मंत्री दशरथ भांडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश नेते महासभेप्रसंगी उपस्थित होते. दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी व वंचित समाजाच्या मतदारांना सभेपर्यंत आणण्याच्या उपाययोजना व संकल्प करून अभूतपूर्व तसेच रेकॉर्डब्रेक सभेची नोंद होईल असा निर्धार भारिप व एमआयएम या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.वंचित आघाडीच्या महासभेला सुमारे लाखाचा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून सभा यश्वस्वीतेसाठी कोअर कमिटी स्थापन करण्यात येऊन विविध समित्या सुद्धा कार्यरत झाल्या आहेत.

धनगर समाजाचा भाजपने केला घात; ॲड. आंबेडकर यांचा आरोप
राज्यातील वंचित बहुजन आघाडीची टक्केवारी 62 टक्के आहे. हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही असे सत्ताधारी सरकारने सांगितले होते. तरी देखील आरक्षणाचा विषय आल्यावर प्रमाणपत्र देत असतांना ओबीसींना जे प्रमाणपत्र देतात तेच प्रमाणपत्र आता मराठा समाजाला दिले जात आहे. त्यामुळे आरक्षणाची दोन ताटे जरी वाढले तर खाण्यासाठी मराठा आणि ओबीसींना आरक्षणाच्या एकाच ताटात जेवन करावे लागत आहे. गेल्या विधानसभा निवडणूकी भाजपने धनगर समजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात आणि केंद्रात सत्ता आली मात्र अद्यापपर्यंत त्यांना आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे आता त्यांनी आरक्षणाची मागणी केलेली नाही किंवा करणारही नाही कारण त्यांना कळून चुकले आहे की, भाजप आणि सेना हे पक्ष शब्द पाळणारा नाही. धनगर समाजाचा आपमान केला. त्यामुळे ते देखील आता निवडणूकीत उतरले आहे.

आरक्षणात ‘अ’ आणि ‘ब’ चे विवरण करा
मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले मात्र आरक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करतांना ओबीसी आणि मराठा यांना एकच प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात ओबीसी समाजात मराठा समाज गणला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असतांना सरकारला वारंवार विनंती करून प्रमाणपत्र वाटप करतांना ओबीसी समाजाला ‘अ’ प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजला आरक्षणाला ‘ब’ प्रमाणपत्र द्या असे सांगितले तरी आहे तो आरक्षणाचा घोळ कायम आहे.

कार्यकर्त्यांची उपस्थिती
जिल्हा निरीक्षक शरद वसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारिपचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, रावेर लोकसभा अध्यक्ष विनोद सोनवणे, कोअर कमिटी अध्यक्ष नेते मुकुंद सपकाळे, सचिव विवेक ठाकरे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष सुजाता ठाकूर, महानगर महिला अध्यक्षा कविता सपकाळे, एमआयएमचे रेयानभाई, जिया बागवान, हाजी शेख युसूफ, जिल्हा उपाध्यक्ष भारत ससाणे, महासचिव गमिर शेख, रवी ब्राह्मणे, युवक जिल्हाध्यक्ष अबू भालेराव, महानगर अध्यक्ष जितू केदार, महानगर महासचिव अनुप पानपाटील, महानगर अध्यक्ष गिरीष नेहते, जिल्हयाचे महासचिव अक्षय जोशी, वैभव शिरतुरे, महानगर संघटक गणेश महाले, महानगर महासचिवहेमंत सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष डिगंबर सोनवणे, राहुल सुरवाडे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष संभा जाधव, अमळनेर तालुकाध्यक्ष दाजीबा गव्हाणे, सचिन अडकमोल, युवराज जाधव, अविनाश नगराळे, अभिजित रंधे, दाजीबा गव्हाणे, पुनमचंद निकम, गौतम पवार, सचिन सुरवाडे, अतुल इंगळे, ज्ञानेश्वर पाटील, आप्पा सावळे, अनिल लोंढे, गोलू केदार, सुनिल सुरळकर, महेंद्र खेडकर, रमेश मगर, अजित शेख, रवींद्र वाघ, रवींद्र साठे, राजेंद्र गोहिल, नरेंद्र निकुंभ, सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

पहा । आरएसएस बाबत आयोजित मेळाव्यात काय म्हटले ॲड. आंबेडकर

Add Comment

Protected Content