धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणूक : १८ अर्ज अवैध

evm1

धरणगाव, प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. मुदतीत आलेल्या एकूण ३८ अर्जांमधून १८ अर्ज अवैध झाले असून २० अर्ज वैध ठरले आहेत.प्रत्येक उमेदवाराने दोन-दोन अर्ज भरले असल्याने ज्या उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला होता त्यांनी आपला दुसरा अर्ज अपक्ष म्हणून तो अर्ज माघार घेतल्याने अवैध ठररण्यात आला आहे.

 

अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. प्रवीण रघुनाथ चौधरी, संभाजी गोविंदा धनगर, हाजी शेख इब्राहिम अब्दुल रसूल, माळी प्रमिला मधुकर, माळी मधुकर बन्सी, चौधरी निलेश भागवत, भोलाने वसंतराव शिवदास, वाघ गुलाबराव रतन, महाजन राजेंद्र किसन, वाघ उषा गुलाबराव, चौधरी निलेश भागवत, पटेल औसिफ सलीम, येवले ललित रामकृष्ण यांचे प्रत्येकी दोन अर्ज, महाजन संजय छगन, वाघमारे दीपक आनंदा, महाजन सुरेखा विजय, महाजन महिंद्र गुलाब या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. आता दोन दिवस माघारीचा कालावधी असून १५ डिसेंबर माघारीचा शेवटचा दिवस असल्याने कोण उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतो, त्या नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Protected Content