…अन् अजितदादांना आठवला सकाळचा शपथविधी !

नाशिक प्रतिनिधी । येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांच्या सोबत सकाळीच घेतलेल्या शपथविधीचा भन्नाट मिश्कील शैलीत उल्लेख करून धमाल उडवून दिली.

नाशिक दौर्‍यादरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी लवकर भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या भाषणात पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, काही जण चर्चा करत होते, मी इतक्या सकाळी येईन का? त्यावर एक जण म्हणाला, हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो ! असं अजित पवार म्हणाले. यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

अजित पवार यांनी याप्रसंगी महाविकास आघाडी सरकार समाजाच्या भल्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. माझे आणि अशोक चव्हाणांचे वाद सुरू असल्याचं वृत्त असल्याचं वृत्त खोटं आहे. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे सरकार चालवण्यासाठी लक्ष देत आहेत, असं म्हणत महाविकास आघाडीत सगळं आलबेल असल्याचं पवारांनी सांगितले.

Protected Content