पारोळा -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी| शिवरे दिगर शिवारातील शेतातील विहिरीतून पाणी भरण्याच्या कारणावरून तरुणासह त्याच्या आई-वडिलांसह लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या ३ जणांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजय ज्ञानेश्वर पाटील (वय-२३ रा. शिवरे दिगर ता. पारोळा) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर शिवारात शेत आहे. रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता अजय ज्ञानेश्वर पाटील हा तरूण त्याची आई ललिता ज्ञानेश्वर पाटील आणि वडील ज्ञानेश्वर पाटील यांच्यासोबत शेतात काम करत होते. त्यावेळी बाजूला शेत असलेले ईश्वर भगवान पाटील, समाधान ईश्वर पाटील आणि अमोल ईश्वर पाटील तिघे रा. शिवरे दिगर ता. पारोळा हे तिघे अजयच्या शेतात आले. त्यावेळी विहिरीतू पाणी का घेतले असे बोलतून अजय पाटील यांच्यासह त्याची आई आणि वडिलांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये अजय पाटील आणि त्याची आई ललिता पाटील हे दोघे जखमी झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता अजय पाटील याने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे ईश्वर भगवान पाटील, समाधान ईश्वर पाटील आणि अमोल ईश्वर पाटील तिघे रा. शिवरे दिगर ता. पारोळा या तिघांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुधिर चौधरी हे करीत आहे.