वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मारहाण करत साहित्याची तोडफोड

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी| वारा वादळामुळे अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे गायत्री नगरातील जिजाऊ वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी वस्तीगृहात शिरुन साहित्याची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, गायत्री नगरात जिजाऊ वस्तीगृह आहे. सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास वादळीवारा सुटल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. याचा राग आल्याने रात्री १२ वाजता परिसरातील अज्ञात इसम जबरदस्ती मुलांच्या वस्तीगृहात शिरले. त्यानंतर याठिकाणावरील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केले. तसेच काहींना विद्यार्थ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांना देखील मारहाण करण्यात आली. आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंगळवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता राहुल पांडुरंग पाटील यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञातांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहेत.

Protected Content