दुचाकीचा ताबा सुटल्याने अपघात; दोन तरूण गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीवरील तोल गेल्याने दोन तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना नशिराबाद गावातील उड्डाणपुलावर  गुरूवारी १३ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी झालेल्या तरूणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळकडून जळगावकडे जाण्यासाठी निघालेल्या दोन तरूणांचा दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईडी ३३३१) वरील ताबा सुटल्याने  अपघात झाल्याची घटना गुरूवारी १३ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास  घडली आहे. या अपघातात भूषण लक्ष्मण लोमटे (वय-२३) रा. मारोड ता. बुलढाणा आणि स्वप्निल नंदू बडगुजर (वय-२२) रा. पारोळा हे दोघेजण गंभीर जखमी झाले. यातील एकाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. जखमींना तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करणयत आले आहे. याबाबत पोलीसा कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content