गरोदर मातांसाठी मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिम राबविणार- डॉ. राजु तडवी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिम-७ आगस्ट पासून सुरू होत असून या संदर्भात पावल पंचायत समितीच्या आरोग्य विभागात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू ताडवी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.

 

यावल तालुक्यात शासनाच्या आरोग्य विभागाच्या सुचनेवरून गरोदर मातांसाठी येत्या ७ ऑगस्ट पासुन विशेष इंद्रधनुष्य मोहीम संपुर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असुन , या आरोग्य मोहीम संदर्भात सुचना आणि मार्गदर्शन करण्याबाबतची बैठक १३ जुलै रोजी यावल पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली.

 

याबाबतची मार्गदर्शनपर माहीती देतांना तालुका आरोग्य अधिकारी राजु तडवी यांनी सविस्तर माहीती देतांना सांगीतले की सदरच्या या आरोग्य मोहीम तीन राऊंड(फेरी) असतील १)पहिली फेरी-७ ते१२ आगस्ट२)दुसरी फेरी-११ते१६ सप्टेंबर३) तिसरी फेरी-९ ते१४ऑक्टोबर तरी आपल्या कार्यक्षेत्रातील (० ते ५ वर्षाआतील ) व गरोदरमाता  यांचे आशावर्करकडून घरभेटीद्वारे गाव, पाडा,वस्ती,झोपडपट्टी, शेतशिवार, बांधकाम, सूतगिरणी इ.ठिकाणी व्यवस्थितपणे सर्वेक्षण करण्यात यावे व सर्व लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून लसीकरण झालेले आहे किंवा सुटलेले/राहिलेले लाभार्थी असतील तर वयानुसार देय असलेली लस आपल्या दरमहा नियमित लसीकरण सत्राच्या ठिकाणी त्याचे लसीकरण करण्यात यावे व Due List अपेक्षित यादी तयार करून मायक्रोप्लंन तयार करण्यात यावे व एकही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सुचना यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजु तडवी यांनी दिल्या आहे.

Protected Content