चिंताजनक : मालेगावात एकादिवसात आढळले कोरोनाचे १८ नवे रूग्ण

मालेगाव (वृत्तसंस्था) आज सकाळी मालेगावमध्ये पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्यात भर म्हणून दुपारी १२ वाजेच्या सुमारास आणखी १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरात दिवसभरात १८ नवे कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. दरम्यान, रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे चार दिवस पूर्णतः लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

 

आजच्या १८ नव्या रूग्णांमुळे मालेगाताली करोना बाधितांची संख्या २७ झाली आहे. त्यापैकी मालेगाममधील एका करोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. मालेगावमुळे नाशिक जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या ३२ झाली आहे. नाशिक शहरात तीन, निफाड आणि चंदवडमध्ये प्रत्येकी एक-एक रूग्ण आढळला आहे. मालेगाव मधून सातत्याने करोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहे मागील तीन दिवसांमध्ये मालेगाव मधून २७ नवे रुग्ण समोर आल्याचे धक्कादायक चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण मालेगावमध्ये आहेत. दरम्यान, मालेगावच्या नयापुरा भागातील २२ वर्षांच्या महिलेचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपूर्वी या महिलेला धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उत्तर महाराष्ट्रात मालेगाव हे करोनाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

Protected Content