अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वर्धमान हौसिंग सोसायटीतर्फे सॅनिटायझरचे वाटप

 

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना यातून सूट देण्यात आलेली आहे. या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वर्धमान हौसिंग सोसायटीतर्फे सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे.

कोरोनाच्या संचारबंदीत शहरातील गरजुंना काही स्वयंसेवी संस्था ह्या अन्न वाटप करत आहे. मात्र, ल अत्यावश्यक सेवा देणारे पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवक, परिचारिका, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व इतर घटकांना घराबाहेर पडावे लागत आहे. यांच्या सुरक्षतेसाठी सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत नाही याची दखल घेऊन ऍड. कुणाल पवार, ऍड. महेश् भोक्रीकर, ऍड. अशोक महजन ,जीवन चौधरी, अतिश चौधरी व वर्धमान हौसिंग सोसायटीच्या वतीने या घटकांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. दरम्यान, संचारबंदीत अन्नदान करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. त्याच प्रमाणे कोणाला मदत करावयाची असेल तर त्यांनी सॅनिटायझर वाटप व वैद्यकीय सेवा देण्यावर भर द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content