जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरात वारकऱ्यांची मांदीयाळी असते. संपुर्ण राज्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील ५०० भारतीय हे अमेरीकेतील न्यू जर्सी येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याला आहे. न्यू जर्सी येथे देखील मराठी बांधवांनी विठ्ठल मंदीराच्या आवारात आषाढी एकादशी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात सह देशभरातील सुमारे ५०० भारतीय हे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे नोकरी, उद्योग या क्षेत्रात काम करीत न्यू जर्सी अमेरिका येथे विठ्ठल मंदिराची स्थापना करण्यात आली. आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गोल रिंगण करून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताबाई विठ्ठल रुक्मणी यांच्या नावाने दिंडी काढण्यात आली. त्याच बरोबर भारतीय वेशभूषेत महिला व पुरुषांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी नामाचा जयघोष करत ढोल ताशाच्या आषाढी एकादशी हा सण अमेरिकेत साजरा केला आहे. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.