सैनिक कल्याण निधीसाठी कृती फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना धनादेश सुपूर्द

जळगाव प्रतिनिधी | सैनिकांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करुन शहीदांना नमन करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त कृती फाउंडेशनच्या वतीने सैनिक कल्याण निधीसाठी ३५ हजार रुपये मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला.

देशाच्या सुरक्षितेसह नागरिकांचे संरक्षण करताना आपले बलिदान देणाऱ्या सैनिक व शहीदांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन व कल्याणासाठी प्रत्येक भारतीयाने कोणत्या ना कोणत्या पद्धतीने योगदान देणे महत्वाचे आहे. हे सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी महत्वाचे आहे. यामध्ये नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव आणि सैनिकांच्या त्यागाबद्दलची भावना जागी होते.

सैनिकांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करुन शहीदांना नमन करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त कृती फाउंडेशनच्या वतीने सैनिक कल्याण निधीसाठी ३५ हजारांचा मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला.

फाउंडेशनने सैनिकांच्या त्यागाप्रती ठेवलेल्या आदरासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी फाउंडेशनसाठी गौरवोद्गार काढले. प्रसंगी फाऊंडेशन अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी.टी. महाजन, कार्याध्यक्ष तथा पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, डी.टी. महाजन, चेतन निंबोळकर आदी. उपस्थित होते.

Protected Content