Big breaking : रावेरात शौचालय योजनेत दिड कोटीचा भ्रष्ट्राचार; दोघांविरुध्द गुन्हा दाखल  

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गरीबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्याससाठी मिळणाऱ्या अनुदानात ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान १ कोटी ५२ लाख ६४ हजार रूपयांचा भ्रष्ट्राचार केला म्हणून रावेर पोलीस स्टेशनला दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे भ्रष्ट्राचार करणा-यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

“स्वच्छ भारत मिशन” ही पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची महत्वकांशी योजना असून गाव हगणदारी मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार वयक्तीक शौचालयच्या माध्यमातुन प्रोत्साहन म्हणून बारा हजार रुपये देते.याच योजनेत मोठा भ्रष्ट्राचार झाला आहे. या प्रकरणी बुधवार, दि २० रोजी पहाटे चार वाजता पंचायत समिती येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल चौधरी यांच्या फिर्यादी वरुन समाधान निंभोरे व मंजुश्री पवार यांच्याविरुध्द रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्हाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक तपास करीत आहे.

दोघांवर दिड कोटींचा भ्रष्ट्राचाराचा आरोप

रावेर पोलीसात दाखल गुन्ह्यात दोघांवर पुढीलप्रमाणे आरोप ठेवण्यात आले आहे. यामध्ये गट समन्वय समाधान निंभोरे यांनी ओळखीच्या लोकांच्या खात्यावर स्वच्छ भारत मिशनच्या खात्यावरुन १ कोटी ५१ लाख ६१ हजार ५३३ वर्ग केल्याचा आरोप आहे. तसेच स्वता:च्या खात्यावर १२ हजार प्रमाणे ३३ वेळा ६ लाख ४ हजार ४७७ रुपये वर्ग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.तसेच  समूह समन्वयक मंजुश्री पवार यांनी १२ हजार रुपये प्रमाणे ३५ ओळखीच्या लाभार्थीच्या नावे ४ लाख २० हजार वर्ग करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच बीडीओ यांच्या खोट्या स्वाक्ष-यांच्या याद्या बँकेला दिल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.

अशी चालते स्वच्छ भारत मिशन योजना –

येथील तालुक्यातील गरीब लोकांना शौचालयाचा लाभ देण्यासाठी पंचायत समितीमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गट समन्वयक समाधान निंभोरे तर समूह समन्वयक मंजुश्री पवार काम बघतात यांच्या कडे बेस लाईन सर्वे नुसार शौचालय बांधकाम करणाऱ्या लाभार्थीचे ग्राम पंचायत स्तरावरुन ग्राम सेवक व सरपंच यांच्या कडून प्रस्ताव मागवणे व याद्याची पडताळणी करून पात्र लाभार्थीची यादी अर्थ विभागातील लेखाधिकारी यांना सुपुर्त करतात लेखाधिकारी आलेल्या लाभार्थी याद्याच्या व बँकेचे खाते क्रमांक यांची पडताळणी करून मागणीनुसार चेक तयार करतात व बिडिओ यांच्या समोर स्वाक्षीरीला ठेवतात त्यानंतर बीडीओं स्वाक्षरी झाल्यावर संबधित अनुदान बँकेतुन थेट शौचालय बांधकाम करणाऱ्या लाभार्थीच्या खात्यात जमा होतात अश्या प्रकारे रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशनचा कारभार चालत असतो.स्वच्छ भारत मिशनच्या अनुदान वाटप सिस्टिम मध्ये ग्राम सेवक, गट समन्वयक, लेखापाल, बिडिओ, बँका, आणि शेवटी लाभार्थी येतात.

या कलमान्वय आहे. गुन्हा दाखल –

गरीबांच्या शौचालयात सुमारे दिड कोटी रूपयांचा भ्रष्ट्राचार केला म्हणून विविध कलमान्वय गुन्हा दाखल आहे.

कलम ४०६  विस्वासघात करणे.

कलम ४२० फसवणुक करणे.

कलम ४०९ ताब्यातील मालमत्तेचा दुरुपयोग करणे.

कलम ४६५ बनावटी करण करणे

कलम ४७१ बनावट दस्ताऐवज तयार करणे

कलम ३४ प्रक्रियेत सहभाग

या प्रश्नाचे उत्तरे मिळतील का ?

– दोघ गट समन्वयकांनी भ्रष्ट्राचार केला असेल तर इतके महीने लेखापाल यांनी याद्या व बँकेच्या खातीची पडताळणी का.? केली नाही

– भ्रष्ट्राचा-याच्या याद्यांवर बिडिओंच्या डुबलीकेट सह्या असेल तर बीडीओंच्या ओरिजनल सह्या असलेल्या यादीतील लाभार्थांनी खरच शौचालय बांधलित का.?

– गट समन्वयक यांनी स्वताच्या खात्या मध्ये सहा लाख टाकली असेल तर दिड कोटी हळप करणारे ते व्हीआयपी कोन.?

– स्वच्छ भारत मिशनच्या बँक खात्यावरुन अनुदान लाटणारे ते व्हीआयपी लाभार्थी कोण.?हे सर्व कोणाच्या आशिर्वादामुळे सुरु होते.

– खरच दोघे गट समन्वयकांना दोषी आहे की संपूर्ण साखळीचा यात दोषी आहे.या प्रश्नाची उत्तरे जनतेला अपेक्षित आहे.

Protected Content