जेवणाचे पैशांवरून हॉटेल मालकासह इतरांवर चाकूहल्ला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील उँट मोहल्ला परिसरातील हॉटेल रुची येथे जेवणाचे पैसे मागितल्याच्या रागातून हॉटेल मालकासह दोन जणांना शिवीगाळ व मारहाण करून चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी १ जानेवारी रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यश रघुनाथ तपकिरे वय-२४ रा. अयोध्या नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे भुसावळ शहरातील उँट मोहल्ला येथे हॉटेल रूची भोज चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी १ जानेवारी रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास प्रदीप कोळी आणि विजय पवार दोन्ही रा. वाल्मिक नगर, भुसावळ हे तिथे जेवणासाठी आले. त्याठिकाणी त्यांनी जेवन केले, त्यानंतर हॉटेल मालक यश तपकिरे यांनी जेवणाचे पैसे मागितले. याचा राग आल्याने संशयित आरोपी प्रदीप कोळी आणि विजय पवार यांनी शिवीगाळ करत हॉटेलमालक यश तपकिरे यांच्यासह हॉटेलमधील जसवंतसिंग राजपूत आणि महेश जाधव यांच्यावर चाकूने वार करून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी प्रदीप कोळी आणि विजय पवार दोन्ही रा. वाल्मिक नगर, जळगाव या दोघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये हे करीत आहे.

 

Protected Content