तरूणाला अज्ञात तिघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरातील प्रितम वाईन दुकानाजवळ दुकान बंद झाल्याचे सांगितल्याच्या कारणावरून अज्ञात तीन जणांनी एका तरूणाला रिक्षातून आलेल्या अज्ञात तीन जणांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.  याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंद नगर परिसरात प्रतिम वाईन दुकान आहे. रविवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता आकाश प्रकाश तायडे वय-२६ रा. समता नगर, जळगाव हा तरून वाईन दुकानासमोरून त्याची दुचाकी काढत असतांना त्यांच्या दुचाकीसमोर एका रिक्षातून अज्ञात तीन जण आले. आकाशला विचारू लागले की, वाईन शॉप चालू आहे का, त्यावर आकाशने दुकान बंद झाल्याचे सांगितले. या रागातून तिघांनी आकाशला पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केली. हा प्रकार घडल्यांनतर सोमवारी १ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण जगदाळे हे करीत आहे.

Protected Content