शिवसेनेच्या १२४ मतदार संघांची यादी जाहीर : जिल्ह्यात चार जागा

 

जळगाव प्रतिनिधी | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चीत झालेला नाही. जागा वाटप जाहीर झाले नसले तरी शिवसेनेच्या वाटेला आलेल्या १२४ मतदार संघांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चार मतदार संघांचा समावेश आहे.

या चार मतदार संघातून गेल्यावेळी शिवसेनेचेच उमेदवार निवडून आले होते. हे मतदार संघ आहेत, जळगाव (ग्रामीण), एरंडोल, चोपडा व पाचोरा शिवसेनेच्या घोषित मतदारसंघातही मुक्ताईनगरचा उल्लेख नसल्याने त्या बाबत सस्पेन्स कायम आहे. आता जिल्ह्यातील केवळ एका मतदार संघाचा निर्णय येणे बाकी आहे. तसेच शिवसेनेच्या जागा १२४ च राहतात की आणखी वाढतात? एवढे बघण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

Protected Content