प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राच्या गेट समोरून दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राच्या गेट समोरून एका डॉक्टर तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून येण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जिल्हा ₹पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, निशा मनोज कुमार पाटील (वय-३८, रा. ढाके कॉलनी, जळगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १२ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास निशा पाटील ह्या त्यांची दुचाकी (एमएच १९ सीएच ५००४)ने जळगाव शहरातील ढाके कॉलनीमध्ये असणाऱ्या प्रजापती ब्रह्मकुमारी केंद्रच्या गेटजवळ आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी त्या ठिकाणी पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. निशा पाटील यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही, अखेर शनिवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील करीत आहे.

Protected Content