Home क्राईम जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला बेदम मारहाण, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला बेदम मारहाण, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

0
103

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील सुभाषवाडी येथील ५४ वर्षीय शेतकऱ्याला जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच्या पत्नीसह बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, देविदास सरदार चव्हाण (वय-५४, रा. सुभाष वाडी, ता. जि. जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता देविदास चव्हाण हे त्यांचे पत्नी गिताबाई चव्हाण यांच्यासोबत घरी असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा ज्ञानेश्वर रणजीत चव्हाण, रणजीत उदा चव्हाण, मेनकाबाई रामचंद्र चव्हाण आणि सोनल उदा चव्हाण सर्व रा. सुभाष वाडी यांनी देविदास चव्हाण आणि त्यांचे पत्नी गीताबाई चव्हाण यांना डोक्यात दगड मारून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी देविदास चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी ज्ञानेश्वर चव्हाण, रंजीत चव्हाण मेनकाबाई चव्हाण, सोनल चव्हाण या चौघावर  एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वप्निल पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound