वरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार शनिवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव गावातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुलगी ही आपल्या मैत्रिणीसह शाळेत जात असतांना संशयित आरोपी रमेश चंद्रकांत पाटील आणि संतोष जानकीराम कोलते दोन्ही रा. विठ्ठल मंदीर वेल्हाळे ता.भुसावळ यांनी दोन्ही मुलींचा पाठलाग करत विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. दरम्यान, पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार वरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ करीत आहे.



