किरकोळ कारणावरून एकाला मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील फेकरी टोलनाका येथे किरकोळ कारणावरून एकाला लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भुसावळ तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अशफाक जाबीर बागवान उर्फ आम्रपाली जोगी (वय- २६, रा. खडका रोड, भुसावळ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील फेकरी टोलनाका येथील हॉटेलच्या मागे असलेल्या जागेत संशयित आरोपी दानिश शेख, बाबा काल्या, सोनू शेख सर्व रा. खडका ता.भुसावळ या तिघांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच एकाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याने दुखापत केली. तसेच एकाने धारदार वस्तूने केस कापून दुखापत केली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ योगेश पालवे करीत आहे.

Protected Content