‘तु मुझे बहुत अच्छी लगती हो’… म्हणत महिलेचा विनयभंग

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । तु मुझे बहुत अच्छी लगती हो.. असे म्हणून शहरातील एका भागात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी २८ जून रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात ३० वर्षीय महिला वास्तव्याला आहे. मंगळवारी २७ जून रोजी त्याच भागात राहणारा रहीम नबी बागवान (वय-३०) याने मध्यरात्री महिलेच्या घरात घसून तू मुझे बहुत अच्छी लगती हो.. असे म्हणून तिचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर संशयित पसार झाला. दरम्यान, महिलेने भुसावळ बाजार पेठ पेठ पोलीस ठाण्यात धाव  घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रहीम नबी बागवान याच्या विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ नेव्हील बाटले करीत आहे.

Protected Content