अजिंठा चौफुलीवर ट्रकचा ब्रेक फेल; सुदैवाने जीवीतहानी टळली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अंजिठा चौफुलीवर विचित्र अपघातात ट्रक, कारसह विद्यूत खांबचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात जीवीतहानी झालेली नाही.

अधिक माहीती अशी की, रावेर तालुक्यातील वाघोड येथून जळगाव शहराकडे जाणा-या ट्रकची अंजिठा चौफुलीजवळील भंगार बाजारावरजवळ अचानक ‘ब्रेक फेल’ झाला. समोरून येणा-या वाहनांना वाचविण्‍याच्या प्रयत्नात हा ट्रक पुढे इदगाह कब्रस्तानाजवळ उभ्‍या असलेल्या ट्रकला जोरदार धडकल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजता घडली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. धडक बसताच उभा असलेला ट्रक हा समोरील कारवर आणि विजेच्या खांब्यावर धडकला. या विचित्र अपघातात सुदैवाने जीवीत हानी झाली नाही, मात्र दोन्ही ट्रक, कार तसेच विद्युत खांबाचे प्रचंड नुकसान झाले होते.

रावेर तालुक्यातील वाघोड येथून सलीम तडवी हा चालक ट्रक (क्र.एमएच.१९.झेड.५७१९) घेवून मंगळवारी पहाटे जळगाव शहराच्या दिशेने निघाला होता. शहरात पोहोचल्यानंतर अंजिठा चौफुलीकडून नेरीनाका स्मशानभूमीकडे येत असताना, अचानक या ट्रकची भंगार बाजाराजवळच्या उतारावर ब्रेक फेल झाले. उतार असल्यामुळे ट्रक हा आणखी भरधाव झाला. समोरून रिक्षा, दुचाकी वाहने येत असल्याचे पाहताच, चालकाने त्यांना वाचविण्‍याचा प्रयत्न करीत असताना ट्रक हा इदगाह कब्रस्ताजळील कॉम्प्लेक्स समोर उभ्‍या असलेल्या अजंठा रोडलाईनच्या ट्रकवर (क्र.एमएच.२०.एटी.२९६५) धडकला. याप्रकरणी अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

 

Protected Content