यावल (लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी) । आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि यावल पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत एका तरुणाला देशी कट्टा आणि २ जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडले आहे.
नेमकी काय आहे घटना?
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर (फैजपूर उपविभाग) यांच्या सूचनेनुसार आगामी सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी आणि गस्त तीव्र करण्यात आली आहे.
हॉटेल श्री समोर सापळा अन् कारवाई माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी आणि यावल पोलिसांच्या संयुक्त पथकाने यावल ते चोपडा हायवेवर किनगाव फाट्या जवळील ‘हॉटेल श्री’ समोर सापळा रचला. सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास संशयित पवन सोनवणे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला खोचलेली लोखंडी देशी बनावटीची पिस्तूल (कट्टा) आणि पँटच्या खिशात २ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी सदर शस्त्रे जप्त केली आहेत.

३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व त्यांचे पथक यावल परिसरात गुन्हे प्रकटीकरणाचे काम करत असताना, पवन कैलास सोनवणे (वय २५, रा. किनगाव बुद्रुक, ता. यावल) हा तरुण स्वतःजवळ बेकायदेशीर देशी कट्टा बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली.
हॉटेल श्री समोर सापळा अन् कारवाई माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी आणि यावल पोलिसांच्या संयुक्त पथकाने यावल ते चोपडा हायवेवर किनगाव फाट्या जवळील ‘हॉटेल श्री’ समोर सापळा रचला. सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास संशयित पवन सोनवणे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला खोचलेली लोखंडी देशी बनावटीची पिस्तूल (कट्टा) आणि पँटच्या खिशात २ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी सदर शस्त्रे जप्त केली आहेत.
आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल
पोलीस अंमलदार सचिन रघुनाथ घुगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पवन सोनवणे याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ॲक्ट) कलम ३, २५(१-B)(a) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला ४ ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करत आहेत.

या पथकाने बजावली कामगिरी:
सदर कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या देखरेखीखाली एलसीबीचे पोउनि सोपान गोरे, पोलीस अंमलदार सलीम तडवी (पोकॉ २५३४), मयुर निकम (पोकॉ ५९८), सचिन घुगे (पोकॉ ८७८) तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोउनि मैनूद्दीन सय्यद आणि हितेश बागुल (पोकॉ २२६) यांच्या पथकाने केली.