आकाशवाणी चौकातून एकाचा मोबाईल जबरी हिसकावला

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौकातून एकाचा महागडा मोबाईल अज्ञात व्यक्तीने लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, चेतन सुदाम सपकाळे रा. समता नगर, वंजारी टेकडी मरीमाता मंदीरामागे जळगाव हा तरूण मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतो. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शहरातील आकाशवाणी चौकातून पायी जात असतांना एक अज्ञात चोरटा दुचाकीवर येवून चेतन सपकाळे यांच्या हातातील साडेसात हजाराचा मोबाईल लांबविला. काही कळण्याच्या आत चोरटा पसार झाला. दरम्यान, याप्रकरणी चेतन सपकाळे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

Protected Content