Home Agri Trends एरंडोल येथे खरीप पूर्व हंगाम प्रशिक्षण शिबिर

एरंडोल येथे खरीप पूर्व हंगाम प्रशिक्षण शिबिर

0
55

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे पंचायत समितीच्या अंतर्गत खरीप पूर्व हंगाम प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले.

पंचायत समितीचे कृषि अधिकारी भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम पूर्ण शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गट विकास अधिकारी डी. ए. जाधव, तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे, एरंडोल तालुका अध्यक्ष श्री स्वामी कृषी केंद्र चे संचालक गजानन महाजन यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास पटाईत साहेब, प्राजक्ता मॅडम, व एरंडोल तालुका मधील सर्व कृषी निविष्ठा धारक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळधिकरी तोडकर यांनी केले.


Protected Content

Play sound