जामनेर शेतकी संघावर देखील भाजपचे वर्चस्व : सर्व जागा बिनविरोध

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील शेतकरी सहकारी संस्थेवर ना. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने वर्चस्व निर्माण केले असून सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

जामनेर शेतकरी सहकारी संस्था निवडणूक लागली असूनयातही ना. गिरीश महाजन यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. या निवडणुकीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्वात सहकार पॅनलच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी व ईश्‍वरबाबू जैन गटाचे उमेदवारांनी निवडणुकीत अर्ज दाखल केले होते.

त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडी च्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तथापि, माघारीच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सर्व सोळा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून याबाबत उद्या अधिकृत घोषणा होणार आहे.

जामनेर तालुका शेतकरी संघावर गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात व माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या सहकार्याने एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची आली आहे. सर्व विजयी उमेदवाराुो लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांनी सत्कार केला. या शेतकरी संघ निवडणुकीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी या शेतकरी संघ निवडणुकीमध्ये आपलं पॅनल निवडून येणार नाही या भीती मुळेच मैदान सोडले असल्याची चर्चा होत आहे. सर्व उमेदवारांनी आपली माघार घेतल्यामुळे जामनेर तालुक्यातील शेतकरी संघावरही ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांची एक हाती सत्ता आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content