फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण उत्सव समिती व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.
प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.बी.तायडे, उपप्राचार्य प्रा. डॉ.एस.व्ही.जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यर्पण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले, डॉ.एस.व्ही.जाधव यांनी भारतीय राजकारणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा प्रभाव याविषयी मार्गदर्शन केले तसेच प्रा.डी.बी. तायडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चे सामाजिक उच्चाटन आणि आर्थिक नियोजन यासाठी केलेल्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली अशा प्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन उत्सव समितीचे प्रमुख प्रा.डॉ.एस. एल. बिऱ्हाडे यांनी व आभार एन.एस.एस. चे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.शेरसिंग पाडवी यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.