Home क्राईम बसमधील प्रवाशी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लांबविले

बसमधील प्रवाशी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लांबविले


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल ते चोपडा बसमधून प्रवास करत असतांना प्रवाशी महिलेच्या गळ्यातील ९५ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता समोार आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगला वसंत पवार वय ६० रा. देवपूर धुळे या महिला चोपडा ते यावल असा बसमधून प्रवास करत असतांना त्यांच्या गळ्यातील ९५ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. हा प्रकार वृध्द महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना सोन्याची पोत संदर्भात चौकशी केली. परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही., अखेर त्यांनी सायंकाळी ६ वाजता यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाख्ल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र पवार हे करीत आहे.


Protected Content

Play sound