शौच खड्डयात पडून महिलेचा मृत्यू


यावल प्रतिनिधी । येथील भुसावळ टी पाँईट जवळ असलेल्या उद्यड्या शौच खड्डयात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

या बाबत चे वृत असे की, यावल शहरातील वर्दळचे ठिकाण असलेल्या भुसावळ टी पॉइट जवळ असलेल्या यावल सहकारी खरेदी विक्री संघा च्या व्यापारी संकुलनात असलेल्या शौचालयाच्या पाण्याचे सुमारे दहा ते बारा फुट खोल मोठे शौच खड्डे आहेत. हे खड्डे गेल्या अनेक दिवसापासुन उघडे पडल्याने या खड्डयात साधारण दोन ते तीन दिवसा पुर्वी यात पडुन एका पंचावन वर्षाच्या महीलेचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. दुर्गंधी सुटल्याने नागरीकांनी या शौच खड्डयात पाहील्यावर महीलेचे प्रेत तरंगतांना दिसुन आले. हे वृत कळताच या ठिकाणी बघणार्‍याची एकच गर्दी जमली होती. यावलचे पोलीस निरीक्षक डी. के. परदेशी व त्यांच्या पोलीस कर्मचारी यांनी नगर पालीकेच्या कर्मचारी बांधव यांच्या मदतीने प्रेतास शौच खड्डयातुन बाहेर काढुन शवविच्छेदना साठी यावल च्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज पाटील यांनी प्रेताची उत्तरीय तपासणी करून शवविच्छेदन केले. दरम्यान, त्या महिलेची अखेर ओळख पटली असून सदरची मरण पावलेली महिला चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असून तिचे नाव कमलाबाई महाजन वय ६० वर्ष असे असून ती आपल्या गावाला जाण्यासाठी भुसावल टी पॉईंट वरील रिक्षा जाण्याच्या बेतात असताना कदाचित या पाण्याच्या टाकीत लघुशंकेला केली असता त्या टाकीत पडून तिचा मृत्यू झाला असावा असा कयास आहे. यासंदर्भात पोलिस स्टेशनला सुधाकर पुंजा भिल या व्यक्तीने राहणार यावल याने खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आली आहे. मयत महिलेचा नातू आकाश महाजन ओळखले आहे त्याच्या म्हणण्यानुसार माझी आजी जयपूर येथे सुरू असलेल्या यात्रेनिमित्त गेल्या होत्या घरी परत येण्यासाठी निघाले असता हा प्रकार घडला असावा.

यावल शेतकी सहकारी खरेदी विक्री संघा च्या मालकीच्या व्यापारी संकुलनात बांधलेल्या ईमारती मधील असलेल्या शौचालयाचा हा शौच खड्डा असुन तो गेल्या अनेक दिवसा पासुन उघड्यावर पडला असुन या कडे व्यापारी संकुलनाच्या माध्यमातुन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार्‍या ईमारती कडे चेअरमन व त्यांच्या संचालक मंडळाचे लक्ष नाही हे यावल वासीयांच्या दुष्टीने दुदैवा ची बाब म्हणावी लागेल. या शौच खड्डयाच्या विषयावर जर संघाच्या मंडळीने लक्ष दिले असते या अज्ञात निरपराध महीलेचे जिव वाचविता आले असते.

Add Comment

Protected Content