नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राहूल गांधी यांनी आधी सावकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागावी आणि मगच महाराष्ट्रात यावे असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
आज नागपुरात पत्रकारांशी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, सावरकरांची राहुल गांधींनी अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केलाय. तीच तीच चूक त्यांनी पाच वेळा केली. अनेकांनी राहुल गांधी यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. तरीही त्यांनी अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा, असा इशारा बावनकुळेंनी दिलाय.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान देखील सावरकरांवर टीका केली होती. इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले होते. या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.